बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नसल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. एसआयटी पथकाच्या हालचाली देखील गतीने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या तपासादरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे, तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे विरोधकही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत आता मोठी घडामोड घडली आहे, मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात दाखल झाले आहेत. सध्या दोघांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू असल्याने, धनंजय मुंडे नेमका काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Posted inPolitics
Dhananjay Munde: राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंची तडकाफडकी दादांच्या भेटीला धाव, राजकीय घडामोडींना वेग
4o